सहभागी व्हा, समरस व्हा

पुणे शहराची ओळख झाली 

पुणे शहरात फेरफेटका मारला 

पुणे शहर एंजॉय करण्यासाठी करमणुकीच्या जागा बघितल्या 

सुरुवातीला वाटणारा परकेपणा आता कमी झाला का? लोक खूप शिष्ठ वाटत होते, राहादरीची भीती वाटत होती. आता काय वाटते? 

आता पुढचे पाऊल म्हणजे समविचारी गट शोधायचे. समविचारी लोकांच्या सहवासात एकटेपणा कमी होतो. त्यांच्याबरोबर काम करताना शिकायला मिळते. आणि नुसतेच शहरात वास्तव्य न राहता समरसून जगाने सुरू होते. 

तुमचा छंद कुठलाही असो, तुम्हाला तुमचा गट मिळणार पुण्यात मिळणार हे नक्की. 

नदी संवर्धन

मुळा आणि मुठा नद्यांच्या संगमाजवळ वसलेले म्हणून पुण्य. पुण्यविषय, पुण्यकविषय, पुणेवाडी असे करत पुणे नाव झाले. शहराचा कचरा आणि सांडपाणी वाहत, प्रदूषित झालेल्या मुळा, मुठा, रामनदीला परत जिवंत करायचे, पूर्वीचे रूप त्यांना देण्यासाठी अनेक गट काम करत आहेत. त्या गटांची माहिती  

टेकडी संवर्धन

पुणे शहर टेकड्यांनी वेढलेले आहे. शहरातल्या वैराण झालेल्या टेकड्यांवर हिरवाई निर्माण करण्याचे काम पुणे शहरात अनेक गट करत आहेत. वृक्षारोपण, लावलेल्या रोपांचे संगोपन, जैवविविधता नोंदणी, भूजल भरणी असे अनेक उपक्रम नियमित चालतात. दर आठवड्याला गट काम करतात. त्या गटांची माहिती 

शहर स्वच्छता

शहर वाढत आहे तसा कचराही. कचरा टाकल्याला सुरुवात होते आणि मग हळूहळू ती कचरा टाकायची जागाच होऊन जाते. ती जागा स्वच्छ करायची, तिथे पेंटिंग करायचे, त्या जागेचा चेहरा-मोहरा बदलायचा, त्या जागेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा असे काम काही गट करत आहेत. त्या गटांची माहिती.