BOOK REVIEW: THE LORAX by DR. SEUSS
हे पुस्तक माझ्या मुलाला तोंडपाठ होतं. पुस्तक वाचलं आणि आम्ही दोघं पुस्तकाच्या प्रेमात पडलो.
हे पुस्तक कोणासाठी आहे? लहान मुलांसाठी आहे? आहेच. त्यांच्यासाठी आहेच. पण त्यातला संदेश जास्ती आपल्यासाठी, मोठ्यांसाठी आहे.
पुस्तक कशाबद्दल आहे हे थोडक्यात सांगायचं तर जरेड डायमंडचं Collapse तुम्ही वाचलं आहे का? तर त्यातला संदेश अगदी कमीत कमी शब्दांत, सगळ्यांना समजेल असा द्यायचा असं सांगितलं तर काय? तर हे पुस्तक, लोऱ्ॅक्स!!
गांधीजींच्या ‘There is enough for everybody’s need and not for anyone’s greed’ ह्या वाक्याचं गोष्टीरूप सार म्हणजे लोऱ्ॅक्स!!
लोऱ्ॅक्सची गोष्ट फ्लॅशबॅकमध्ये येते. गोष्ट सांगतो तो ‘Oncler’.
Oncler हे नावही खूप समर्पक आहे बरं का. त्याचा उलगडा पुढे होतो. once एकदाच, कायम नाही अशा अर्थाने ‘lack of sustainability’ दाखवणारं आहे.
एक मुलगा फिरत फिरत ‘स्ट्रीट ऑफ द लिफ्टेड लोऱ्ॅक्स’ अशा ठिकाणी येतो. जिथे काटेरी गवत आणि कावळे ह्यांशिवाय कोणीच नसतं. ही काय जागा आहे आणि ही अशी का झाली ही गोष्ट त्याला वन्सलरकडून समजते.
खूप वर्षांपूर्वी वन्सलर इथे आला तेव्हा सगळीकडे ट्रफुला ट्री होते. त्यांची फळे खाणारे ब्राऊन बारबालूट होते. सुंदर तळी आणि त्यात स्वोमि स्वान आणि मासे होते.
वन्सलरने ठरवलं ही जागा परफेक्ट आहे. त्याने एक ट्रफुला ट्री तोडलं आणि त्यापासून THENEED (हा शब्द लक्षात आला? :-)) तयार केलं.
झाड तोडताच तिथे लोऱ्ॅक्स हजर झाला. I am Lorax and I speak for the trees म्हणत त्याने झाड तोडल्याबद्दल जाब विचारला. वन्सलरने तयार केलेले theneed बघितल्यावर हे असलं काहीतरी कोण घेईल असं उपहासाने म्हणाला.
पुढच्याच क्षणी एक माणूस आला आणि वन्सलरने मागितलेल्या किमतीला त्याने theneed विकत घेतलं.
वन्सलर हसला, लोऱ्ॅक्सला म्हणाला, ‘तू मूर्ख आहेस. तुला माहित नाही, लोक काय काय विकत घेतील ह्याचा नेम नाही.’
वन्सलरने मग झाडे तोडायचा सपाटाच लावला. त्याने theneed बनवण्याचा कारखाना सुरू केला. त्याच्या नातेवाईकांना बोलावलं. Theneed ची मागणी वाढू लागली तसे त्याने कारखाना वाढवला.
एका वेळी एक झाड तोडणं फारच unproductive होतं. मग त्याने एका घावात चार झाडं तोडणारं यंत्र तयार केलं. चौपट उत्पादन!! कारखाना वाढत गेला.
झाडे संपत चालली तसे बारबालूट उपाशी राहू लागले. ते तिथून निघून गेले.
कारखान्याचे प्रदूषित पाणी वन्सलरने तलावात सोडले. कारखान्याचा धूर हवेत पसरला. तलावातले मासे गेले,
स्वान दुसरीकडे निघून गेले.
कारखाना वाढत होता, उत्पादन वाढत होते, business वाढत होता.
लोऱ्ॅक्स अधूनमधून येऊन वन्सलरला जागं करण्याचा प्रयत्न करत होता.
आणि एक दिवस वन्सलरने शेवटचे ट्रफुला ट्री तोडले.
शेवटचे ट्रफुला ट्री.
ट्रफुला ट्री संपले. theneed चा कारखाना बंद झाला. busienss संपला. सगळे नातेवाईक निघून गेले.
आता राहिले दोघंच, वन्सलर आणि लोऱ्ॅक्स.
शेवटी लोऱ्ॅक्सही तेथून निघून गेला. तो नुसता गेला नाही. UNLESS हा शब्द लिहून गेला.
वन्सलर म्हणतो, तू इथे आल्यामुळे मला लोऱ्ॅक्स त्या शब्दाचा अर्थ कळला.’
असं म्हणत वन्सलर एक बी मुलाच्या हातात टाकतो. ट्रफुला ट्रीची बी. शेवटची बी.
‘ही पेर, त्यातून झाड येईल, त्याची अनेक झाडे होतील, त्यांचे संरक्षण कर, कुऱ्हाडीपासून त्यांना वाचव. असं केलंस तर लोऱ्ॅक्स आणि त्याचे मित्र परत येतील.’
UNLESS someone like you cares a whole awful lot, nothing is going to get better. It’s not.
1971 साली हे पुस्तक प्रकाशित झाले. Dr. Seuss म्हणतात ‘लोऱ्ॅक्स माझ्या संतापातून निर्माण झाला. कोणाला काय वाटतं हा विचार न करता जे चुकीचं आहे त्यावर मला प्रहार करायचा होता.’
Dr. Seuss हे लेखक आणि चित्रकार होते. त्यांच्या सगळ्या पुस्तकातील चित्रं त्यांनी स्वतः काढली आहेत. त्यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य म्हणजे ते शक्यतो सरळ रेषा आणि काटकोन वापरत नाहीत. त्यांच्या चित्रातल्या इमारतीही तशाच असतात, curved lines असलेल्या.
लोऱ्ॅक्स मध्ये सध्याचे प्रदूषित वातावरण, पूर्वीचे सुंदर वातावरण, त्यातला फरक हे त्यांनी वापरलेल्या रंगसंगतीतून आपोआप आपल्या पर्यन्त पोहोचते.
Dr. Seuss ह्यांचे खरे नाव, थिओडोर सयूस गेसेल असे आहे. कॉलेजमध्ये असताना काही नियमांचे उल्लंघन केले म्हणून कारवाई झाल्याने त्यांनी हे पेननेम घेऊन त्यांचे अवांतर उद्योग सुरू ठेवले.
लोऱ्ॅक्स पुस्तकावर चित्रपट आहे. मूळ गोष्टीत खूप बदल केला आहे. पण गोष्टीतला संदेश कुठेही न हरवता.
पुस्तक वाचावेच असे आहे पण चित्रपटसुद्धा जरूर बघावा असा आहे.
Positive feedback loop’ ही Systems Thinking मधली संकल्पना लोऱ्ॅक्सच्या मदतीने खूप छान शिकवता येते.
Dr. Seuss ह्यांची मला आवडलेली आणखी काही पुस्तकं,
How the Grinch stole the Christmas!
Horton hears a Who!
The Cat in the Hat
१९८९ साली अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्यात लोऱ्ॅक्स पुस्तकावर बंदी घालण्यात आली. कोणी घातली? Logging industry ने. म्हणजे झाडे तोडून ती विविध ठिकाणी कच्चा माल पाठवणारी यंत्रणा. लाकूड, लगदा ह्यापासून पुढे विविध उत्पादने तयार केली जातात.
लोऱ्ॅक्समुळे ह्या इंडस्ट्रीबद्दल मुलांच्या मनात वाईट प्रतिमा तयार होईल असा त्यांचा आक्षेप होता. शिवाय त्यात समाजातील consumerism म्हणजे उपभोगवादाबद्दल जी टीका केली आहे त्याबद्दलही आक्षेप घेण्यात आला.
लहान मुलांसाठी लिहिलेल्या पुस्तकाने एखाद्या इंडस्ट्रीला धोका वाटावा हे त्या पुस्तकाचं यश म्हणावं का?
Dr. Suess ने हे पुस्तक का लिहिलं ते आपण वर बघितलं. त्यांचा उद्देश सफल झाला असं म्हणायला हरकत नाही. त्यांना ज्याकडे लोकांचं लक्ष वेधायचं होतं, ज्यावर सडकून टीका करायची होती ती व्यवस्थित जिथे लागू पडत होती तिथे पोहोचली.
Did you like the review? Would you like to borrow this book to read?
Fill out the form below. When someone fills out the I HAVE THIS BOOK form, we will notify you. Connect, and exchange book and ideas
Do you have this book? Would you like to lend it to someone who wants to read it? Please fill out this form.