The Snail and the Whale

Book Cover
The Snail and the Whale
by
Julia Donaldson & Axel Scheffler
ही गोष्ट आहे एका गोगलगाईची आणि व्हेल माशाची.
 
ही छोटीशी गोगलगाय समुद्रकिनाऱ्याजवळच्या खडकावर रहात होती. समुद्राकडे बघत, तिथे येणारी मोठमोठी जहाजे बघत ती विचार करायची आपणही असेच जग बघायला जाऊ. पण गोगलगाईला हे कसं जमणार? काय करणार?
 
त्या खडकावर इतर गोगलगाई होत्या. त्या वैतागून आपल्या छोट्याश्या गोगलगाईला म्हणायच्या ‘किती वळवळी आहे ही, जरा शांत बसत नाही.’
 
एक दिवस तिला युक्ति सुचली. गोगलगाई चालताना मागे तार सोडत जातात ना. गोगलगाईने त्या तारेने एका खडकावर लिहिले की तिला जग बघायचे आहे त्यासाठी ‘लिफ्ट’ हवी आहे.
 
ते वाचून एक हंपबॅक व्हेल आला आणि गोगलगाईला आपल्या शेपटीवर बसवून घेऊन गेला. त्याच्या शेपटीवर बसून गोगलगाईने काय काय बघितले, बर्फाच्छादित प्रदेश, सोनेरी वाळूचे समुद्रकिनारे, खोल समुद्रातले रंगीबेरंगी आणि काही भीतीदायक मासे.
 
एक दिवस दोघांची स्वारी एका समुद्रकिनाऱ्याजवळ आली. लोक तेथे बोटी चालवत होते, स्पर्धा करत होते, बोटींचे कर्कश हॉर्न आणि लोकांचे ओरडणे ह्यामुळे गोंधळून गेलेला व्हेल किनाऱ्याच्या खूप जवळ आला.
ओहोटी सुरू झाली, पाणी मागे गेले आणि व्हेल किनाऱ्यावर अडकला.
 
गोगलगाईने त्याला पाण्यात ढकलायचा प्रयत्न केला. हे आपल्याला शक्य नाही हे लक्षात येताच ती मदत मागायला म्हणून गेली.
 
जवळच शाळेची घंटा ऐकू आली आणि तिला युक्ति सुचली.
 
शाळेच्या फळ्यावर चढून तिने जसा खडकावर संदेश लिहिला होता, तसेच फळ्यावर लिहिले,
‘Save the Whale’.
 
शाळेतली मुले, त्यांचे शिक्षक किनाऱ्याकडे निघाले.
 
अग्निशामक दलाचे ट्रक आले.
त्यांनी व्हेलवर पाण्याचे फवारे सुरू ठेवून त्याला थंड ठेवले.
 
भरती सुरू झाली, पाणी व्हेलपर्यन्त आले आणि व्हेल परत समुद्रात गेला.
 
व्हेलने गोगलगाईला परत किनाऱ्यावर सोडले तेव्हा सगळ्या गोगलगाई त्यांच्याभोवती जमल्या. दोघांनी त्यांना त्यांच्या सफरीची गोष्ट सांगितली. गोगलगाईने एवढ्या मोठ्या व्हेलला कसे वाचवले ही गोष्ट व्हेलने त्यांना सांगितली.
आणि
मग व्हेलने त्याची शेपटी खडकाजवळ आणली. सगळ्या गोगलगाई शेपटीवर बसल्या आणि निघाल्या जग बघायला.
 
मदतीची गरज कोणालाही लागू शकते. 
मदत कोठूनही मिळू शकते
आपल्याला मदत हवी आहे हे जाहीरपणे सांगणे गरजेचे आहे.

Did you like the review? Would you like to borrow this book to read? 

Fill out the form below. When someone fills out the I HAVE THIS BOOK form, we will notify you. Connect, and exchange book and ideas 

Do you have this book? Would you like to lend it to someone who wants to read it? Please fill out this form. 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *