पुण्याची ओळख झाली. आता शहरात नुसते रहायचे नाही — शहर जगायचे आहे.
ह्या पानावर पुण्यातले छोटे आनंद, विरंगुळ्याच्या जागा तुम्हाला मिळतील. 

एकूण काय, आपण पुणे ENJOY करू. 

PUNE CITY MINI GUIDE​

नवीन शहरात रुळताना जी भीती, गोंधळ आणि एकटेपणा असतो — त्यासाठी ही छोटी मार्गदर्शिका. हे वेबपेज मार्गदर्शिकेचा भाग आहे.

पुणे शहरातल्या बागा

तुमच्या जवळची बाग कशी शोधणार? खालील लिंकवर पुणे महानगरपालिकेच्या बागांची यादी आहे.

लिंकवर क्लिक करा.

Ctrl + f करा, सर्च विंडो येईल.

त्यात तुम्ही रहात असलेला भाग द्या, उदा. warje/ vadgaon sheri/ dhanori/ kothrud.

पुणे वाचन संस्कृती

पुणे शहर म्हणजे विद्येचे माहेरघर. इथे पुस्तकांची दुकाने ही केवळ खरेदीची जागा नसून भेटण्याची, विचारांची आणि शांत वेळ घालवण्याची ठिकाणे आहेत. अप्पा बळवंत चौकातील पुस्तकांची गल्ली, पगडंडी बुक्स चहा कॅफे, डेक्कन बुक स्टॉल किंवा सेकंड-हँड पुस्तकांची छोटी दुकाने — प्रत्येक ठिकाणी पुण्याचा वेगळा स्वभाव भेटतो.