सहभागी व्हा
पुण्यात सहभागी होणे म्हणजे कुठल्याही ‘संस्थेचा भाग’ होणे नाही.
तुम्हाला नक्की काय आवडते हे माहित असेल तर काही प्रॉब्लेम नाही. तुमच्या आवडत्या थीमवर क्लिक करा आणि सुरुवात करा.
नक्की काय करायचे हा प्रश्न असेल तरी काही प्रॉब्लेम नाही. एखाद्या रविवारी नदीवर, एखाद्या रविवारी टेकडीवर, एखादा आठवडा स्वच्छता करून बघा. कुठलाही गट निवडलात तरी खूप उत्साही आणि छान लोकांबरोबर तुम्हाला काम करता येईल हे नक्की. जे काम आवडेल त्या गटात सामील व्हा.
ह्या सगळ्या गटांत सामील होणे अगदी सोपे आहे. एकदा सामील झालात म्हणजे ती कायमस्वरूपी कमिटमेंट नाही. शेवटी आपल्याला आवडणारे काम आणि समविचारी लोक मिळणे महत्वाचे आहे.
आदल्या दिवशी दिलेल्या नंबरवर फोन करा. काही विशेष कार्यक्रमामुळे नियमित वेळापत्रक बदलू शकते.
मुठा नदी, विठ्ठलवाडी, सिंहगड रोड
Google Map Link: https://maps.app.goo.gl/212ZdJQCgu2Tpstj9
वेळ: दर रविवारी सकाळी 7 ते 9
उपक्रमाबद्दल: दत्तक घेऊया नदीकिनारा ह्या उपक्रमातला हा पहिला प्रकल्प. मे 2017 पासून इथे नियमित काम सुरू आहे. स्वच्छता, wetland restoration, awareness sessions इथे नियमित सुरू असते.
संपर्क: 9881303596, 9673058527
Jeevitnadi – Living River Foundation
राम-मुळा नदी संगम, आलोमा कौंटीजवळ, औंध
Google Map Link: https://maps.app.goo.gl/BheouhPQQ1JdwgKJA
वेळ: दर रविवारी, सकाळी 7:30 ते 9
उपक्रमाबद्दल: दत्तक घेऊया नदीकिनारा ह्या उपक्रमातला हा प्रकल्प. ऑगस्ट 2017 पासून इथे नियमित काम सुरू आहे. स्वच्छता, wetland restoration, awareness sessions, Nature Walk, Tree Mapping इथे नियमित सुरू असते.
संपर्क: 9930809046, 8379835690
Jeevitnadi – Living River Foundation
मुळा नदी, वाघाचा घाट, राजीव गांधी पूलाजवळ, औंध </br>
Google Map Link: https://maps.app.goo.gl/62BVPaYft7nt5ShH6
वेळ: दर शनिवारी, सकाळी 7:30 ते 8:30
उपक्रमाबद्दल: दत्तक घेऊया नदीकिनारा ह्या उपक्रमातला हा प्रकल्प. जुलै 2017 पासून इथे नियमित काम सुरू आहे. स्वच्छता, निर्माल्य खतनिर्मिती, awareness sessions इथे नियमित सुरू असते.
संपर्क: 9960350779, 8007130700
Jeevitnadi – Living River Foundation
मुळा, मुठा आणि राम नदीवर स्वच्छता, नदी संवर्धन उपक्रम नियमित सुरू असतात.
उपक्रमांची यादी, गूगल मॅप लोकेशन, संपर्कासाठी तपशील दिले आहेत. तुम्हाला सोयीच्या ठिकाणी ह्या रविवारी जा, सहभागी व्हा, अनुभव घ्या.
नदीवर जाताना बरोबर न्यायच्या गोष्टी: डोक्यावर टोपी, पायात शूज, पाण्याची बाटली.
Pune Window Seat Tip: काम करून झाले, की नदीकाठी थोडा वेळ शांत बसा. वाहणाऱ्या नदीप्रवाहाचा आवाज ऐका, नदीवर येणाऱ्या पक्षांचा आवाज ऐका. ही नदी आपण, म्हणजे मानव पृथ्वीवर उत्क्रांत होण्याच्या आधीपासून वहात आहे. आज आपण हिच्या काठावर आहोत, तसे पूर्वी आपले पूर्वज हिच्या भरवशावर इथे राहिले. नदी ह्या शहरातून वहात नाहीये, नदी इथे होती म्हणून हे शहर इथे आले. हा विचार नदीकडे बघायचा दृष्टिकोनच बदलतो.
पुणे शहर हे सर्व बाजूंनी टेकड्यांनी वेढलेले शहर आहे. पण वृक्षतोड, अतिक्रमण ह्यांनी त्या ग्रस्त आहेत. वन विभागाने लावलेले उंदीरमारीचे वृक्ष एवढीच काय ती हिरवाई त्यांच्यावर होती.
मग नागरिक पुढे सरसावले. रोपे लावली, लांब लांबून पाणी आणून, नियमित निगा राखून ती वाढवली.
रोपे लावणे, mulching करणे, खत तयार करणे, जैवविविधतेची नोंद करणे अशी अनेक कामे हे गट नियमित करतात.
टेकडीवर जाताना: डोक्यावर टोपी, पायात शूज, पाण्याची बाटली.
खाली त्यांची माहिती.
बाणेर टेकडी
Google Map Link: https://maps.app.goo.gl/hPo7JsdYiAYQzyuGA
वेळ: दर रविवारी सकाळी 7 ते 9:30
उपक्रमाबद्दल: डॉ. गारुडकर वसुंधरा अभियान 2006 पासून बाणेर टेकडी संवर्धनाचे काम करत आहे. एकेकाळच्या वैराण टेकडीवर आज 160 विविध प्रजातीची सुमारे 15000 झाडे आहेत ती त्यांच्यामुळे.
वृक्षारोपण, संवर्धन, पाणी घालणे, तण काढणे, रोपांसाठी पिंजरा उभा करणे इत्यादी कामे नियमित सुरू असतात.
संपर्क:
Dr. Garudkar – 98220 60259
Monali shah – 8390701644